Type Here to Get Search Results !

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन ; आमदार गोपीचंद पडळकर



धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन ; आमदार गोपीचंद पडळकर


सांगली : धनगर आरक्षणाबाबत 10 महिन्यापासून झोपी गेलेल्या कुंभकर्ण सरकार विरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून  25 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलनाची घोषणा आमदार पडळकर यांनी केली. सदरची आंदोलनाची घोषणा त्यांनी सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.


राज्यभरात धनगर समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन करेल आणि समाजानेही या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागे करावे, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सुरुवात झाली असून 25 सप्टेंबर रोजी आपण पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत सरकार विरोधात हे आंदोलन करणार असल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.  


गेल्या दहा महिन्यांपासून सरकार सत्तेमध्ये आलेले आहे. मात्र धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक पाऊलही सरकारने उचललेलं नाही, तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतुदी केली होती. मात्र त्यामधील एक रुपया सुद्धा या सरकारने दिला नाही, याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका ही सरकारकडून घेण्यात आली नाही,असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies