ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 22, 2020

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे निधनज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे निधन  


मुंबई : मराठी  चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू आणि गुणी कलाकार ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर  यांचे आज कोरोनाने निधन  झाले.  


आशालता वाबगांवकर यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.  मराठी चित्रपट सृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-याला, वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. संगीतावर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.


आशालता वाबगावकर यांनी आपल्या सोज्वळ आणि सहज अभिनयामुळे चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटविला होता. विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलावंत हरपला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

No comments:

Post a Comment

Advertise