Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्यात

 

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्यात


सांगली : महाराष्ट्रात जवळपास 3 लाख 70 हजार आणि सांगली जिल्ह्यात 10 हजार विद्यार्थ्यांची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप (दहावीनंतर) आधार सीडेड बँक खाते नसल्याने त्यांच्या सध्याच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यावर मार्ग काढत अशा विद्यार्थ्यांची आवश्यक अशी सर्व माहिती "इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेला" सादर केली आहे. जेणेकरून अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या गावातील पोस्ट ऑफिसमध्ये / आपल्या पोस्टमनकडे आधार सीडेड इंडिया पोस्ट पेमेंट्सस बँक खाते काढता येईल. विद्यार्थ्याला मिळणारी शिष्यवृत्ती हि DBT स्वरूपात मिळत असल्याने आधार क्रमांक लिंक असणे अतिशय आवश्यक असल्याची माहिती डाकघर सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक अशोक खोराटे यांनी दिली.


खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक, मोबाईल व स्कॉलरशिपसाठी अर्ज करतांना आलेला 17 अंकी "APPLICATION NUMBER" (उदा.1920XXXXXXXXX2292) घेऊन आपल्या गावातल्या पोस्ट ऑफिस/ मुख्य डाक घर सांगली / मिरज किंवा पोस्टमन कडे जाऊन "इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे" आधार सीडेड बँक खाते काढून घ्यावे, असे आवाहन श्री. खोराटे यांनीकेले आहे.


जिल्ह्यातील सर्व 419 पोस्ट ऑफिसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल. तसेच त्यासाठीची मोहीम सुरू झाली असून विद्यार्थ्यांना एसएमएस आणि व्हॉट्सएपच्याद्वारे याची माहिती कळविण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यात सप्टेंबर 2018 मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सुरू झाली तेंव्हापासून जिल्ह्यात 2 लाख 15 हजार खातेधारक या बँकेशी जुळले आहेत. तसेच लॉकडाऊन काळात बँकेने AEPS सुविधेद्वारे जवळपासस 1 लाख ग्राहकांना 25 करोड रुपये घरपोच प्राप्त करून दिले. स्कॉलरशिप खात्यांसह प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री कृषी सम्मान योजना, मातृत्व वंदना योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, मनरेगा, विविध पेन्शनन व अन्य सरकारी डीबीटी योजनांचा लाभ ग्राहकांना मिळत असल्याची माहिती श्री. खोराटे यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies