आटपाडी, विटा, खरसुंडीतील रुग्णालयांना ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका : आम. पडळकर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 4, 2020

आटपाडी, विटा, खरसुंडीतील रुग्णालयांना ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका : आम. पडळकरआटपाडी, विटा, खरसुंडीतील रुग्णालयांना ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका : आम. पडळकर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : विटा, आटपाडी आणि खरसुंडी येथील शासकीय रुग्णालयासाठी प्रत्येकी सतरा लाख रुपयांच्या एकेक अशा ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका आपल्या स्थानिक विकास निधीतून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र हि दिले आहे.


खानापूर, आटपाडी तालुक्यात ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आगामी काही दिवसांत ही परिस्थिती आणखी गंभीर होणार हे लक्षात घेत भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना पत्र देवून विटा, आटपाडी आणि खरसुंडी या शासकीय रुग्णालयांना प्रत्येकी एक अशा तीन कार्डियाक रुग्णवाहिका त्यांच्या स्थानिक विकास निधीतून घेण्यात याव्यात अशी सूचनाही केली आहे.


खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील कोविड सेंटर फुल्ल झाली आहेत. अनेकांना घरीच आयसोलेट होण्यास संगितले जात आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी भयानक अवस्था आहे.  


अशावेळी रुग्णांना अन्य ठिकाणी हलविण्यासाठी किंवा एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाताना ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेची गरज आहे. ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेची विटा सोडता आटपाडी तालुक्यात कोठेही नाही. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेचा मोठा फायदा रुग्णांना होणार असून त्या लवकरात लवकर मिळाल्यास रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise