Type Here to Get Search Results !

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोनाग्रस्त



विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोनाग्रस्त


मुंबई :  पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. गेले काही दिवस विदर्भात पूरपरिस्थितीचा आढावा आणि विविध कामांसंबंधी दौरे केले.


यादरम्यान मला कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यामुळे चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. “गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले.  


यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये,” असे नाना पटोले यांनी ट्विट केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies