आटपाडीच्या डाळिंब सौदे बाजारात डाळिंबाला उच्चांकी दर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 4, 2020

आटपाडीच्या डाळिंब सौदे बाजारात डाळिंबाला उच्चांकी दर

 


आटपाडीच्या डाळिंब सौदे बाजारात डाळिंबाला उच्चांकी दर   

आटपाडी/प्रतिनिधी : कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा सुरू झालेल्या आटपाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळींब सौदे बाजारात शुक्रवारी डाळिंबाला विक्रमी दर मिळाल्याने डाळिंब शेतकऱ्यांनामधून समाधान व्यक्त होत आहे.


सांगली जिल्हा हा जयंत पाटलांची जहागिरी आहे काय? आम. गोपीचंद पडळकर


माळशिरस (जि.सोलापूर) येथील शेतकरी हणमंत गोरे यांच्या चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रति किलो तब्बल १५७ रूपये इतका सौदे बाजारात दर मिळाला. या उच्चांकी दराबद्दल बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी शेतकऱ्यांचा गौरव केला. 


वाचा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोनाग्रस्त


सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यानंतर आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजाराचा मोठा दबदबा निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी थेट बागेतून माल व्यापाऱ्यांना देण्याऐवजी सौदे बाजारात डाळिंबाची विक्री करण्याला प्राधान्य दिले आहे. 


कोरोना संकटामुळे अनेक दिवस आटपाडीचा डाळिंब अडत बाजार बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. परंतु बाजार आता पूर्ववत झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारामध्ये आपली डाळिंबे विक्री साठी आणण्याचे आवाहन सचिव शशिकांत जाधव यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise