Type Here to Get Search Results !

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व फळबागांचे पंचनामे करून तातडीने मदत द्या : सौ. पुष्पाताई सरगर

सौ. पुष्पाताई जयवंत सरगर


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व फळबागांचे पंचनामे करून तातडीने मदत द्या : सौ. पुष्पाताई सरगर 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्याूत काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिके व फळबागाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके व फळबागा हातातून निघून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे शासनाने तत्काळ पंचनामे करावेत. तसेच आपत्कालीन निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टारी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आटपाडी पंचायत समितीच्या माजी उपसभापती व विद्यमान सदस्या सौ. पुष्पाताई जयवंत सरगर यांनी आटपाडी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


आटपाडी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसात अतिवृष्टीमुळे माण नदी दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसाने पाणी नदीच्या बाहेर पडल्याने नदीकाठच्या शेतात पाणी शिरले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.


अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याने शेतकर्यांनच्या सर्वच उभ्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे व फळबागांचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. तसेच शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून आपत्कालीन निधीतून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सौ. पुष्पाताई जयवंत सरगर यांनी तहसिलदार यांच्याकडे केली केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies