कुरुंदवाडी परिसरात पावसाने घरांची पडझड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 19, 2020

कुरुंदवाडी परिसरात पावसाने घरांची पडझडकुरुंदवाडी परिसरात पावसाने घरांची पडझड 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात काल मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांची त्याच बरोबर घरांची ही मोठी पडझड झाली असून तालुक्याच्या पश्चिम भागातील कुरुंदवाडी गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, काल दिनांक १८ रोजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सलग तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ज्यांच्या घरांची भिंती मातीच्या होत्या व जीर्ण झालेल्या होत्या अशा नागरिकांच्या घरे कालच्या पावसात पडली असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  


ज्यांची-ज्यांची घरे पावसाने पडली आहेत अशा लोकांना शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी सरपंच सौ. वगरे यांनी केली आहे. तसेच अजून ही मोठा पाऊस येण्याची शक्यता असल्याने ज्या नागरिकांची घरे जीर्ण व कुमकुवत झाली आहेत अशा नागरिकांनी प्राथमिक शाळा किंवा समाजमंदिरा मध्ये स्थलांतरीत होण्याचे आवाहन ही सरपंच सौ. वगरे यांनी नागरिकांना केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise