Type Here to Get Search Results !

Kerala Plane Crash I केरळ विमान अपघाताचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, 18 मृत, 170 बचावले

 केरळ विमान अपघाताचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, 18 मृत, 170 बचावले


कोझिकोड : (Kerala Plane Crash) केरळ येथे झालेल्या विमान दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं आहे. या अपघातात दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला असून 170 लोकांचा जीव वाचवण्यात आला आहे. एअर इंडियाचं विमानामध्ये 190 लोकं होती. 


ज्यात 174 प्रवाशी, 10 मुलं, 4 केबिन क्रू आणि 2 पायलट होते. अपघातातील सर्व जखमींना मल्लपुरम आणि कोझिकोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पावसामुळं  विमान कोझिकोड रनवेवरुन घसरलं आणि 35 फुट खाली कोसळले. यात एअर इंडियाच्या IX-1344 या विमानाचे दोन तुकडे झाले.


दुबईवरुन येत असलेलं विमान अचानक दरीत कोसळलं आणि मोठा आवाज झाला. मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. रनवेहून घसरुन पुढे हे विमान निघून गेलं, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचं विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळलं आणि विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात 191 प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे.


सदर घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. (Kerala Plane Crash) कोझिकोडमध्ये विमान अपघात झाल्याने मी दु:खी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी मी बोललो. असे ते म्हणाले.

Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies