आटपाडी पंचायत समितीत कामाशिवाय येणाऱ्याला 'ब्रेक' - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 8, 2020

आटपाडी पंचायत समितीत कामाशिवाय येणाऱ्याला 'ब्रेक'

 

आटपाडी पंचायत समितीत कामाशिवाय येणाऱ्याला 'ब्रेक' 


माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : संपूर्ण देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने या विषाणूपासून वाचविण्यासाठी काळजी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आटपाडी पंचायत समितीमध्ये आता कामाशिवाय विनाकारण येणाऱ्याला चाप बसणार आहे.  


आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई कनेक्शनमुळे कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यातच आता कम्युनिटी स्प्रेड होण्यास देखील सुरुवात झाली आहे. ५० वर्षावरील प्रत्येक नागरिकांची रॅपिड टेस्ट (Rapid test) केली जात आहे. या रॅपिड टेस्ट मधून अनेक नागरिक कोठेही बाहेर न जाता त्यांच्या शरीरामध्ये कोरोनाचे विषाणू सापडू लागल्याने ते कोरोनाग्रस्त बनू लागल्याने त्याच पार्श्वभूमीवर आटपाडी पंचायत समिती येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. यामध्ये बरेच जण विनाकारण येत असतात. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारत येत नसल्याने याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे याबाबत गाऱ्हाणे मांडले.


याबाबत सविस्तर चर्चा होवून आटपाडी पंचायत समितीची (Atpadi Panchayat Samiti) दोन्ही गेट बंद करून फक्त एक लहान गेट सुरु करण्यात आले. याच ठिकाणी गेटवर आवक-जावक टेबल ठेवण्यात आला असून यापुढे ज्यांना निवेदन द्यायची असतील त्यांना या ठिकाणीच निवेदने द्यावी लागणार आहेत. तर पंचायत समितीमध्ये आत जायचे असते त्यांना गेटवर नाव नोंदणी करून ज्यांच्याकडे जायचे आहे त्यांचे नाव लिहावे लागणार असून वेळ ही नमूद करावी लागणार आहे. याच ठिकाणी सॅनिटायझर व तापमापक गण (Sanitizers and thermometers) ठेवण्यात आली असून आत जाणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजण्यात येणार असल्याने कोरोनाचा धोका टळणार आहे. तर दुसरीकडे विनाकारण येणाऱ्याला चाप बसणार असल्याने कर्मचारी व अधिकारी सुरक्षित राहणार आहेत.

Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise