माजी राज्यमंत्री शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 5, 2020

माजी राज्यमंत्री शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन


माजी राज्यमंत्री शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन 

अहमदनगर : शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल राठोड यांनी नगर मतदारसंघात 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलं होतं. मात्र गेल्या वर्षापासून अनिल राठोड हे आजारी होते. त्यातच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती.

त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे. राठोड यांना आठ दिवसापूर्वी करोना झाला होता. त्यामुळे त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. या उपचाराला ते चांगला प्रतिसादही देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः राठोड यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. राठोड यांना न्युमोनियाची लागणही झाली होती. त्यातून ते बरे होत होते. बरे वाटू लागल्याने त्यांनी हलका आहार घेण्यास सुरुवातही केली होती. मात्र आज पहाटे ६ वाजता त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise