Type Here to Get Search Results !

वडनेर येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेती विषयक विविध उपक्रम संपन्न


वडनेर येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेती विषयक विविध उपक्रम संपन्न 

माणदेश एक्सप्रेस न्यूज


सदाशिवनगर/वार्ताहर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलीत कृषी महाविद्यालय फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड 2020-2021 अंतर्गत वडनेर येथे कापूस/ तुर शेंडा खोडणी  यंत्र तयार करण्यात आले. यावेळी हे तंत्रज्ञान तयार  करण्यासाठी लागणारी सामग्री व तंत्रज्ञानाची कशा प्रकारे मांडणी करावी याबाबत कृषिकन्या कु.कोमल मुकुंद रणदिवे या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना माहिती दिली. वडनेर येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम व कृषी-औद्योगिक जोड 2020-2021 अंतर्गत कापूस/तुर शेंडे  खोडणी तंत्रज्ञान हे प्रात्यक्षिक राबवण्यात आले.


निंबोळी अर्क बनवणे, कीड-रोग नियंत्रण, औषध फवारणी, विविध पद्धतींचा वापर करून तणनियंत्रण,पनीर बनवणे, पिकांची अन्नद्रव्य कमतरता, वृक्षारोपण कलम करणे बीज प्रक्रिया ॲप संदर्भात माहिती, तन नाशक संदर्भात माहिती, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, इत्यादी सर्व प्रकारची माहिती देण्यात आली. तसेच मार्गदर्शन करून विविध प्रकारचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी कृषिकन्या कु.कोमल रणदिवे या विद्यार्थिनीचे आभार मानले या कृषी कन्येने शेतकऱ्यांकडून ही अनेक प्रकारची माहिती घेतली.  


कृषी महाविद्यालय फलटण प्रा. डॉ एस डी निंबाळकर, कार्यक्रम प्रमुख मिलिंद काळे, कार्यक्रम समन्वयक प्राचार्य कर्चे, व इतर प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम व कृषी-औद्योगिक जोड हा कृषी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा भाग असून शेती व औद्योगिक बाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळते, असे कु. कोमल रणदिवे या विद्यार्थिनीने सांगितले व उपस्थित शेतकरी बंधूंचे आभार मानले याबाबत कृषी सहाय्यक भारत जालिंदर काशीद यांचे सहकार्य लाभले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies