Type Here to Get Search Results !

केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेतील यशस्वी उमेदवारांचा दि. 25 ऑगस्टला विधानमंडळातर्फे गौरव


केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेतील यशस्वी उमेदवारांचा दि. 25 ऑगस्टला विधानमंडळातर्फे गौरव

माणदेश एक्सप्रेस न्युज


मुंबई :केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेल्या "नागरी सेवा परीक्षा- 2019" यामध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा गौरव समारंभ मंगळवार, दिनांक 25 ऑगस्ट, 2020 रोजी सायंकाळी 4.00 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.  


हा कार्यक्रम श्री.रामराजे नाईक-निंबाळकर, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, श्री. नाना पटोले, मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, श्री. उध्दव ठाकरे, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. अजित पवार, मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. नरहरी झिरवाळ, मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, श्री. बाळासाहेब थोरात, मा. महसूल मंत्री, ॲड. अनिल परब, मा. संसदीय कार्य मंत्री, श्री. प्रविण दरेकर, मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद, श्री. देवेंद्र फडणवीस, मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा तसेच  श्री. सतिश गवई, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.


बुध्दीमत्ता, ध्येय, एकाग्रता, अभ्यासूवृत्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत उज्वल यश मिळवणाऱ्या या गुणवंत विद्यार्थांचा गौरव विधानसभा अध्यक्ष मा.श्री.नाना पटोले यांच्या संकल्पनेनुसार, महाराष्ट्र विधानमंडळातर्फे, प्रथमच करण्यात येत आहे. यावर्षी जवळपास 80 उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परिक्षेत सुयश प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विधानमंडळाकडून या यशस्वी उमेदवारांचा गौरव म्हणजे स्वजनाकडून त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली कौतुकाची दाद असून त्यांच्या भावी उज्वल  कारकिर्दीकरीता शुभेच्छा आहेत.  


या कार्यक्रमासाठी यशस्वी उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले असून कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक सूचनांचे पालन करण्यात येईल, अशी माहिती विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) श्री.राजेंद्र भागवत यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies