काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत राज्यातील “या” बड्या नेत्याचे नाव चर्चेत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 24, 2020

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत राज्यातील “या” बड्या नेत्याचे नाव चर्चेत


काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत राज्यातील “या” बड्या नेत्याचे नाव चर्चेत

माणदेश एक्सप्रेस न्यूज


मुंबई : काँगेसमध्ये सध्या अध्यक्ष पदावरून अंतर्गत वाद सुरु झाला. एकीकडे काही दिग्गज नेत्यांना नव्या अध्यक्षपद बदलाची शक्यता आहे, तर दुसरीकडे काही नेते राहुल गांधी याच्याकडे अध्यक्ष पद सोपवण्यास आग्रही आहेत. विशेष म्हणजे या सर्व शर्यतीत काही गांधी कुटुंबाबाहेरील दिग्गज नेत्यांचीही नाव चर्चेत आहेत. दिग्गज नेते मुकुल वासनिक यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्याचीही राजकीय चर्चा आहे. यामुळे आता काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळेल की पुन्हा पक्षाचं नेतृत्व गांधी घराण्याकडेच राहील? याकडे आता पक्ष कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे.


काँग्रेसच्या 23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रात गल्लीपासून दिल्लीपर्यत बदल करत नवीन पक्षाध्यक्षाची मागणी केली आहे तर दुसरीकडे काहींनी राहुल गांधी यांच्याचकडे पुन्हा नेतृत्व द्यावीत अशीच आग्रही मागणी होते. यावरूनही पक्षांतर्गत दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यानंतर सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यातच राहुल गांधी मात्र अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यास तयार नसल्याचेही राजकीय सूत्रांची माहिती आहे.


दरम्यान जर सोनिया गांधी यांनी राजीनामा दिल्यास अध्यक्षपदाचे नेतृत्व कोणाकडे सोपवणार हा प्रश्न काँग्रेससमोर असेल. सध्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन नावांची चर्चा होत असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एके अँटनी किंवा महाराष्ट्रातील जेष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं अशी राजकीय सूत्रांची माहिती आहे.  


No comments:

Post a Comment

Advertise