ज.लियाकत शमशेर काझी यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 24, 2020

ज.लियाकत शमशेर काझी यांचे निधन

 म्हसवड/अहमद मुल्ला : ज. लियाकत शमशेर काझी वय ६५ वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ज.लियाकत काझी हे काझी गल्ली येथील अमीना मशिदीचे इमाम म्हणून परिचित होते.  


तसेच समाज सेवेचे कामही त्यांचे वाखण्यासारखे होते. म्हसवड परीसरात समाजामधील कोणाचेही निधन झाले तर त्याचे सर्व विधीचे काम ते करत होते.  


समाजातील सर्व विधीची कुराणपठन, फातीहा, कराणखानी आदी कामे ते करत होते तसेच ते नगरसेवक अकिल काझी यांचे चुलते होते त्यांच्या अचानक निधनामुळे समाजात मोठी न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.


No comments:

Post a Comment

Advertise