Unlock 3 : प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदी हटविण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 22, 2020

Unlock 3 : प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदी हटविण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश


Unlock 3 : प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदी हटविण्याचे  केंद्राचे राज्यांना निर्देश


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. याबाबत केंद्राने नुकतेच अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यातील नियमावली जारी केली आहे. यामध्ये राज्यांना प्रवासी तसेच माल वाहतुकीवरील बंदी हटवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या बंदीवरून केंद्राने राज्यांना फटकारले असून त्वरीत ही बंदी उठवण्यास सांगितले आहे.


केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी पत्र लिहून राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहसचिवांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक ३ च्या नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले आहे.


राज्यातंर्गत वा राज्याराज्यातील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन असायला नको. राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतुकीवर लादण्यात आलेल्या बंधनाचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरील मालाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवरही झाला आहे. विस्कळीत व्यवहारांचा परिणामुळेच बेरोजगारी देखील वाढत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise