अभिनेता प्रवीण तरडे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा : ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 22, 2020

अभिनेता प्रवीण तरडे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा : ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी


अभिनेता प्रवीण तरडे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा : ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी 


सांगली, दि. 22:  “मुळशी पॅटर्न" या सिनेमाचा अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे याने घरात गणपती बसवला होता. भारतीय संविधानाच्या पुस्तकावर गणपती बसवुन तो फोटो सोशल मीडियात वायरल केला. हे कृत्य भारतीय संविधानाचे जाणीवपूर्वक केलेले अवमानकृत्य आहे. हे राज्य संविधनाच राज्य आहे, मनुस्मृतीचे नाही. संविधानाचा अवमान हा देशद्रोह आहे. प्रसिद्धीसाठी, मनुवादी विचारसरणीच्या वर्चस्वासाठी जाणिवपूर्वक केलेला हा खोडसाळपणा आहे. भारतीय संविधान ही भारताची गरिमा आहे, भारतीयांची अस्मिता आहे. गणपती संविधानावर बसवून आम्ही संविधान मूल्य नाकारतो हाच यामागील षडयंत्र आहे. गणपती बसवण्याच्या पहिल्या दिवशी संविधान विरुद्ध मनुवाद हा संघर्ष पेटवण्याचं यामागे षडयंत्र होतं.


संविधानवादी भारतीयांचा भावना दुखावल्या असून प्रवीण तरडेवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा अध्यक्ष मानतेश कांबळे, अमोल वेटम, आकाश कांबळे, गौतम भगत, अॅड. नितीन संबोधी, किरण कांबळे, रोहन मुळीक, आदिनी ऑनलाइन तक्रार दाखल करून मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise