Type Here to Get Search Results !

होय..... अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आमच्याच देशात ; पाकिस्तानची प्रथमच कबुली


होय..... अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आमच्याच देशात ; पाकिस्तानची प्रथमच कबुली


इस्लामाबाद : १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने प्रथमच दिली आहे.


दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी देखरेख ठेवून असणाऱ्या एफएटीएफ या संस्थेच्या कारवाईची टांगती तलवार पाकिस्तावर आहे.

 


त्यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना आणि हाफिझ सईद, मसूद अझहर आमि दाऊद इब्राहिमसह अन्य काही बड्या दहशतवाद्यांवर कारवाईचा बडगा उगारत कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तसेच पाकिस्तान गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिम हा आपल्याकडे असल्याची बाब सातत्याने नाकारत होता. मात्र आज पहिल्यांदाच पाकिस्तानने दाऊद हा आपल्या देशात लपून बसला असल्याचे खुलेपणाने मान्य केले आहे.


१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो नागरिक मारले गेले होते. तसेच संपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, या हल्ल्यामागील सूत्रधार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये असल्याचे भारताकडून वारंवार सांगण्यात येत होते. मात्र भारताचे हे म्हणणे पाकिस्तानकडून सातत्याने फेटाळून लावण्यात येत होते. मात्र आज पाकिस्तानने स्वत:च कबुली दिल्याने ही बाब खरी असल्याचे सिद्ध झाले आहे.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies