आज सायंकाळ ७ पर्यंत कृष्णेचे पातळी ३८ ते ४० फुट होण्याची शक्यता : कार्यकारी अभियंता ना. शं. करे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

आज सायंकाळ ७ पर्यंत कृष्णेचे पातळी ३८ ते ४० फुट होण्याची शक्यता : कार्यकारी अभियंता ना. शं. करे

आज सायंकाळ ७ पर्यंत कृष्णेचे पातळी ३८ ते ४० फुट होण्याची शक्यता : कार्यकारी अभियंता ना. शं. करे


सांगली, दि. 17,: कृष्णा, कोयना, वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वा कृष्णा नदीची आर्यविन पूल येथे पाणी पातळी 27.10 फुट इतकी होती. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे.  


त्यामुळे दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत कृष्णा नदीची आर्यविन पूलाची पाणीपातळी अंदाजे 38 ते 40 फुट इतकी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे असे आवहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ना. शं. करे यांनी केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळोवेळी अद्यावत माहिती कळविण्यात येईल असे त्यांनी कळविले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise