अलमट्टीतून २ लाख ५० हजार क्युसेक विसर्ग : मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

अलमट्टीतून २ लाख ५० हजार क्युसेक विसर्ग : मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

अलमट्टीतून २ लाख ५० हजार क्युसेक विसर्ग : मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर


कोल्हापूर : अलमट्टीतून २ लाख ५० हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात येणार असल्याचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले. 


सध्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून यामुळे अपरिमित जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे पाणी सध्या पात्राबाहेर असून धोक्याच्या इशाऱ्यावरून वाहत आहे.

 


 सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी ३३ फुटावर असून सायंकाळी ती ४० फुटावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 


याबाबत मंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी आज पुन्हा कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून आज  2 लाख 50 हजार इतका विसर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचा फुगवटा कमी होणार असून पूर परिस्थिती नियंत्रणात येणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise