दिघंचीतील कंटेनमेंट झोन काढण्यासाठी पालकमंत्री जयंतराव पाटील यांना साकडे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 9, 2020

दिघंचीतील कंटेनमेंट झोन काढण्यासाठी पालकमंत्री जयंतराव पाटील यांना साकडे


दिघंचीतील कंटेनमेंट झोन काढण्यासाठी पालकमंत्री जयंतराव पाटील यांना साकडे

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची ता.आटपाडी, जि.सांगली येथील कंटेनमेंट  झोन (Containment zone) चा कालावधी कमी करून त्या  ठिकाणची बाजारपेठ पूर्ववत सुरू करा अशी मागणी दिघंचीचे सरपंच अमोल मोरे (Amol More, Sarpanch of Dighanchi) यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील (District Guardian Minister Jayantrao Patil) यांच्याकडे केली.  


ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव, मुन्ना (भाई) तांबोळी यांच्यासह सरपंच अमोल मोरे यांनी जिल्ह्याचे  पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली.


यावेळी बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट मीटिंग मध्ये याबाबतचा प्रस्ताव (The proposal was tabled at a cabinet meeting on Wednesday) ठेवून याबाबतची चर्चा करून योग्य ती निर्णय घेऊ  अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी दिल्याचे सरपंच अमोल मोरे यांनी सांगितले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise