आटपाडी पोलीस स्टेशनला दोन “युवा राजकीय” नेत्यावर गुन्हे दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 9, 2020

आटपाडी पोलीस स्टेशनला दोन “युवा राजकीय” नेत्यावर गुन्हे दाखल


 आटपाडी पोलीस स्टेशनला दोन “युवा राजकीय” नेत्यावर गुन्हे दाखल 

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलीस ठाणे येथे निंबवडे येथील रस्त्याच्या तक्रारी बाबत दोन गटात मारहाण होवून यामध्ये आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला असून सादर गुन्हयामध्ये आटपाडी तालुक्यातील दोन राजकीय युवा नेत्यांचा समावेश आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी विद्या उत्तम मेटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी १ मधुकर शंकर पिंजारी २ यशवंत शंकर पिंजारी ३ शामराव शंकर पिंजारी ४ सिताराम शामराव पिंजारी प मंगेश मधुकर पिंजारी समाधान रघुनाथ पिंजारी हणमत तातोबा पिंजारी ८ रघुनाथ शंकर पिंजारी नाना हणमत पिंजारी १० सचिन गोरड ११ मारुती हरीबा पिंजारी १२ विक्रम पाटील १३ बाळासो बापु मोटे १४ सचिन नाना मोटे सर्व रा. निंबवडे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. 


यामध्ये फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादीने ये जा करण्यासाठी काढलेली चारी मुजवली असता वरील आरोपी मजकुर यांनी ती चार परत जेसीबीच्या सहायाने उकरुन काढत असताना यातील फिर्यादी व फिर्यादीचे पती उत्तम मेटकरी यांनी विरोध केला असता यातील आरोपीनी मिळून एकत्र येवुन त्यांचे पायातील चप्पालीनी व लाथाबुक्यानी फिर्यादीस व तिचे पती उत्तम यांना मारहाण करुन शिवीगाळी करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सदरच्या मारामारी मध्ये फिर्यादीचे जवळ येवुन फिर्यादीची साडी ओजुन तसेच ब्लाउजचे बटन तोडुन तिचे मनास लज्जा उत्पन्न होईन असे कृत्य केल्याने त्यांच्यावर कलम ३५४, ३२७, ३२३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


तर सौ. संगिता मधुकर पिंजारी वय वर्ष ४२ यांनी १ उत्तम आप्पा मेटकरी २ कुंडलीक नाना पिंजारी ३ राघव तुकाराम मेटकरी ४ आनंदा खाशाबा पिंजारी ५ जयवंत राजाराम सरगर ६ नाथा आप्पा मेटकरी ७ विदया उत्तम मेटकरी ८ अनिल सर्जेराव पाटील १ समाधान दाजी पिंजारी १० नामदेव नाना पिंजारी ११ बाजीराम दाजी पिंजारी १२ आप्पा थोडीबा मेटकरी १३ पांडुरंग दगहु पिंजारी ११ मधुकर धोंडीचा पिंजारी १५ शांताबाई आप्पा मेटकरी यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.


यामध्ये यातील आरोपी क्र. १ याने टाकलेला मुरुम जेसीबीच्या सहाय्याने फिर्यादीचे पती मधुकर हे काढण्यासाठी आले असता यातील आरोपी क्र १ याने फिर्यादीचे पतीस शिवीगाळी मारहाण करुन फिर्यादीचे गळयातील तिन तोळ्याचे गंठन हिसडा मारुन काढून घेतले आहे. 


आरोपी क्र २ याने फिर्यादीचे जाउ संजूबाई हीस तु इथे का आली आहेस असं म्हणुन तिची साडी ओढून तिचं ब्लाउजचे बटन तिचे मनास लज्जा उत्पन्न होइल असे कृत्य केले आहे.


आरोपी क्र ३ व ५ यांनी फिर्यादीचे पती मधुकर याना काठीने मारहाण केली आहे. व आरोपी के ६ ते १८ यांनी फिर्यादी व फिर्यादीचे पती यांना काठीने व लाधाबुक्यांनी पाठीवर पायावर मारहाण करुन शिवीगाळी करून दमदाटी केली आहे. याबाबत वरील आरोपी विरुद्ध भा.दं.वि.  कलम ३५४, ३२४, ३२७, १४३, १४७, १४९, ५०४, ५०९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


सदर गुन्हामध्ये निंबवडे येथील युवा नेते व आटपाडी पंचायत समितीच्या माजी उपसभापती व विद्यमान सदस्या सौ. पुष्पाताई जयवंत सरगर यांचे पती जयवंत सरगर (Former Deputy Chairman and current member of Atpadi Panchayat Samiti Mrs. Jaywant Sargar, husband of Pushpatai Jaywant Sargar) व आटपाडी येथील सिद्धिविनायक उद्योग समुहाचे प्रमुख अनिल (शेठ) पाटील (Anil (Sheth) Patil, Head of Siddhivinayak Industries Group) या दोन राजकीय युवा नेत्यावर गुन्हे दाखल झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.    


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस   


No comments:

Post a Comment

Advertise