नेलकरंजी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 19, 2020

नेलकरंजी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द

 

नेलकरंजी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द


सांगली, दि. 19  : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी-बाबू नरसुचीवस्ती परिसरामध्ये हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.  


सदर बाधित क्षेत्रात शेवटचा रूग्ण 21 जुलै रोजी आढळून आला होता. तद्नंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी करण्यात आलेली कंटेनमेंट झोनची अधिसूचना दि. 19 ऑगस्ट पासून रद्द करण्याची अधिसूचना विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी जारी केली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise