आटपाडी तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 19, 2020

आटपाडी तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


आटपाडी तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


सांगली, दि. 19 : आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी (पाटीलवाडा), आटपाडी (कोष्टी गल्ली, सागरमळा नं 2, बसस्थानक, कोष्टी-माळी गल्ली), आटपाडी (मुलाणकी), दिघंची (ग्रामपंचायत पाठीमागे, लोहार गल्ली, वडार गल्ली), झरे (मानेवस्ती, डीसीसी बँकच्या पाठीमागे), करगणी (वराडखडी रस्ता, कोळा चौक) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर परिसर कंटेनमेंट झोन केला आहे.  


तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर   झोन केला आहे. अशी माहिती विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिली. सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise