सरकारी नोकरीसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार ; केंद्र सरकारचा निर्णय ; प्रकाश जावडेकर यांची माहिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 19, 2020

सरकारी नोकरीसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार ; केंद्र सरकारचा निर्णय ; प्रकाश जावडेकर यांची माहिती


सरकारी नोकरीसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार ; केंद्र सरकारचा निर्णय ; प्रकाश जावडेकर यांची माहित ी 


नवी दिल्ली :  नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच CET घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.


म्हणून National Recruitment Agency या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल. त्यामुळे नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही.  


प्रकाश जावडेकर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, युवकांना जागोजागी परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच सामान्य पात्रता परीक्षा असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise