Type Here to Get Search Results !

सेवासदन हॉस्पिटलमधील कोविड सेंटरचा शुभारंभ



सेवासदन हॉस्पिटलमधील कोविड सेंटरचा शुभारंभ 


सांगली : मिरजेच्या सेवासदन हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० बेड्सची क्षमता असलेले कोविड सेंटर उभारले गेले असून या सेंटरचा शुभारंभ राज्याचे जलसंपदामंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.



रविकांत पाटील यांनी कोणताही शासकीय निधी न घेता कोविड सेंटरची उभारणी केल्याबाबत जयंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले. कोरोनाच्या वाढत्या फैलावाविरोधात लढण्यासाठी सध्या समाजाला अशा कोविड सेंटर्सची मोठी आवश्यकता आहे.




जिल्हा प्रशासनाने सर्व गोष्टी लक्षात घेत लॉकडाऊनची घोषणा केली. जिल्ह्यात सर्व गरजेच्या वस्तूंचा, औषधांचा पुरवठा केला आहे. प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केले.





जनतेने या रोगाला घाबरून जाऊ नये. प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखावी आपण नक्कीच कोरोनाला पराभूत करू अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.




यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील,  डॉ. रविकांत पाटील आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies