मंत्रीपदाची ऑफर होती पण... - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 2, 2020

मंत्रीपदाची ऑफर होती पण...मंत्रीपदाची ऑफर होती पण...


मुंबई :  महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका मंत्रिपदाची ऑॅफर होती. मात्र त्यावेळी संघटनेने काही भूमिका घेतली नाही. मंत्रिपद मिळालं असतं तर माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असता, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.


मंत्रिमंडळात मंत्रिपदाची ऑॅफर होती. मात्र त्यावेळी राजू शेट्टी आणि संघटनेने कुठलीही भूमिका घेतली नाही. अर्थात यामुळं मी राजू शेट्टी किंवा संघटनेवर आजिबात नाराज नाही,
कारण शेवटी ती संघटनेची भूमिका आहे. मी शेवटपर्यंत माझा मतदारसंघ आणि शेतकऱ्यांसाठी काम करत राहणार आहे.


माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र भुयारांना मंत्रिपद मिळत असताना राजू शेट्टी यांनी मिळू दिलं नाही, असा आरोप केला आहे. त्यावर बोलताना भुयार यांनी प्रतिक्रिया दिली.
No comments:

Post a Comment

Advertise