१९ तासानंतर चिमुकल्याची ढिगाऱ्याखालून सुटका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 25, 2020

१९ तासानंतर चिमुकल्याची ढिगाऱ्याखालून सुटका

 

१९ तासानंतर चिमुकल्याची ढिगाऱ्याखालून सुटक ा 


महाड : महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तब्बल 19 तासांनंतर साडेतीन वर्षांच्या मोहम्मद बांगी या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलं. यावेळी सगळ्यांचाच चेहरा आनंदाने उजळून निघाला.  


एनडीआरएफच्या जवानांना दोन पिलरमध्ये एक पाय हलताना दिसला. एका जवानांना पायाला अलगद स्पर्श करत त्याला खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोहम्मदनेही त्यांना प्रतिसाद दिला आणि काही क्षणातच एनडीआरएफच्या जवानांनी तो पिलर कटरच्या साह्याने तोडून चिमुकल्या मोहम्मदला या ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढले.  


इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कालचा एक आणि आज चार मृतदेह दिसत आहेत. ढिगाऱ्याखाली 18 ते 19 लोक अडकल्याची शक्यता आहे. मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसान भरपाई दिली जाईल. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हजार रुपये दिले जातील. इमारतीमधील रहिवाशांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise