लॉकडाऊन हवं की नको? मनसेचा सर्व्हे कौल जाहीर ; सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 26, 2020

लॉकडाऊन हवं की नको? मनसेचा सर्व्हे कौल जाहीर ; सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा


लॉकडाऊन हवं की नको? मनसेचा सर्व्हे कौल जाहीर  


मुंबई :  लॉकडाऊन हवं की नको?' याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  सुरु केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी साडे पाच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबत जनतेची काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी मनसेनं सहा दिवसांचे सर्वेक्षण सुरु केलं होतं. आज मनसे नेते संदिप देशपांडे यांनी या सर्वेक्षणाचा कौल जाहीर केला आहे.

 


राज्यातील जनतेला लॉकडाऊन बाबत काय वाटत. तसंच, लॉकडाऊन हवं की नको? यावर तुमचं मत मांडा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं होतं. मनसेचे सरचिटणीस यांनी त्यांच्या ट्विटरवर हे सर्वेक्षण सुरु केलं होतं. यात ७०.०३ टक्के लोकांनी लॉकडाऊनविरोधात मत नोंदवली आहे. तर, २६ टक्के लोकांनी लॉकडाऊनचे समर्थन केलं आहे.


मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल

 • लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?
 • होय- ७०.३ टक्के
 • नाही- २६ टक्के
 • माहित नाही- उर्वरित


 • लॉकडाऊनच्या तुमच्या नोकरीवर नकारात्मक परिणाम झाला आहे का?
 • होय- ८९.८ टक्के
 • नाही- ८.७ टक्के
 • माहित नाही- उर्वरित


 • लॉकडाऊनच्या काळात बुडालेल्या नोकरी व उद्योगंधद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली का?
 • होय- ८.७ टक्के
 • नाही- ८४.९ टक्के
 • माहित नाही- उर्वरित


 • राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?
 • होय- ३२.७ टक्के
 • नाही- ५२.४ टक्के
 • माहित नाहीः १४.९ टक्के


 • शालेय शुल्काबाबतच्या सरकारी धोरणांची अंमल बजावणी होत आहे का?
 • होय- १०.३ टक्के
 • नाही- ७४.३ टक्के
 • माहित नाही- १५. ४ टक्के


 • लोकलसेवा रेल्वेसेवा आणि एसटी सेवा पूर्वरत सुरू झाली पाहिजे का?
 • होय- ७६.५ टक्के
 • नाही- १९.४ टक्के
 • माहित नाही- उर्वरित


 • लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?
 • होय- ८.३ टक्के
 • नाही- ९०.२ टक्के
 • माहित नाही- उर्वरित


 • लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत व योग्य मिळाली आहे का?
 • होय- २५.९ टक्के
 • नाही- ६०.७ टक्के
 • माहित नाही- १३.४ टक्के


No comments:

Post a Comment

Advertise