आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड

आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड 

माणदेश एक्सप्रेस न्यूज


आटपाडी/प्रतिनिधी : आमदार गोपीचंद पडळकर यांची भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी निवड करण्यात  आली आहे. याबाबत स्वत: त्यांनी ट्वीट करून सदरची माहिती दिली.


ट्वीट ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे मनःपूर्वक धन्यवाद! पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे मांडण्याचा कायमच प्रयत्न असेल. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा जी, माझे मार्गदर्शक आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्ये यांचे संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार !


आमदार पडळकर यांना भाजपने आमदारकी पाठोपाठ प्रदेशाच्या प्रवक्तेपदी निवड केल्याने साहजिकच पक्षामध्ये त्यांना मोठे वजन प्राप्त झाले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise