पंचायत समितीचा कमर्चारी पॉझिटीव्ह आल्याने कमर्चारी व अधिकाऱ्यांचे कामकाज इमारतीच्या बाहेर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

पंचायत समितीचा कमर्चारी पॉझिटीव्ह आल्याने कमर्चारी व अधिकाऱ्यांचे कामकाज इमारतीच्या बाहेर

पंचायत समितीचा कमर्चारी पॉझिटीव्ह आल्याने कमर्चारी व अधिकाऱ्यांचे कामकाज इमारतीच्या बाहेर

माणदेश एक्सप्रेस न्यूज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समितीचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आज दिवसभर पंचायत समितीचे कर्मचारी व अधिकारी यांनी बाहेर इमारतीच्या बाहेर राहूनच आपले कामकाज चालवावे लागले.


याबाबत अधिक माहिती अशी की, पंचायत समिती पाणी तपासणी प्रयोगशाळा कडील कमर्चारी याचा कोरोना अहवाल हा दोन दिवसापूर्वी पॉझिटीव्ह आला होता. सदरच कर्मचारी हा कोरोनाचा अहवाल येण्याच्या अगोदर कार्यालयात कामकाज करीत होता. आज सोमवारी संपूर्ण कर्मचारी कामावर आल्यावर सदर बाबत माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी यांनी संपूर्ण ऑफिस सॅनिटाइज केल्याशिवाय काम करणार नसल्याचा पवित्रा घेतला. 


त्यामुळे पंचायत समितीच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी ताबडतोप संपूर्ण ऑफिस सॅनिटाइज करण्याचे काम हाती घेवून ते सॅनिटाइज केले. परंतु आज दिवसभर कर्मचारी व अधिकारी यांना इमारतीच्या बाहेर थांबूनच आपापले कामकाज करावे लागले. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise