दुधदर वाढीसाठी आमदार पडळकरांनी गाईच्या गोठ्यात बसून मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

दुधदर वाढीसाठी आमदार पडळकरांनी गाईच्या गोठ्यात बसून मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र

दुधदर वाढीसाठी आमदार पडळकरांनी गाईच्या गोठ्यात बसून मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र 

माणदेश एक्सप्रेस न्यूज


आटपाडी/प्रतिनिधी : आज दि.१७ रोजी बाळेवाडी ता.आटपाडी येथे,गाईच्या गोठ्यातून तून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहिले असून पत्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रू. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रू. अनुदान द्यावे. किंवा राज्य सरकारने गायीचे दूध प्रति लिटर ३० रु. प्रमाणे खरेदी करावे अशा मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.


यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी (शेठ) यमगर, भाजपा तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी,विष्णूपंत अर्जून, अनिल सुर्यवंशी, अनिल हाके, गणपत खरात, जीवन कासार संगिता खरात, रामभाऊ कारंडे, आबासाहेब यामगर, सुर्याबा यमगर, सोमा कोळेकर, श्रीमंत खताळ, सुभाष यमगर, ज्ञानेश्वर कचरे, भारत पाटील, उषा यमगर, राधाबाई यमगर, सुशीला यमगर, वर्षा यमगर, मनीषा यमगर, सिंधू भुते, सुनिता यमगर, शारदा भुते, ताई खताळ यांच्यासह शेतकरी बांधव, माता-भगिनी व पदाधिकारी उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise