Type Here to Get Search Results !

जिल्हा प्रशासन व मनपाच्या वतीने सर्वोपचार रुग्णालय उभे करावे ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेकडे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केली मागणी



जिल्हा प्रशासन व मनपाच्या वतीने सर्वोपचार रुग्णालय उभे करावे ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेकडे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केली मागणी

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : कोविड च्या संदर्भात जिल्हा प्रशासन व मनपाचे काम चांगले आहे. परंतु सर्वोपचार रुग्णालयाअभावी रुग्णाचे प्रचंड हाल होत असुन उपाचाअभावी रुग्ण व त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.  


यावर जिल्हा प्रशासन व मनपाच्या वतीने तातडीने सर्वोपचार रुग्णालय उभे करावे अशी मागणी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली.


आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सांगली दौऱ्यावर आले होते त्यांनी मनपाच्या कोविड सेटर ला भेट दिली. त्यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजयकाका पाटील, नगरसेवक शेखर इनामदार, महापौर गिताताई सुतार, शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, सभागृह नेते पै.युवराज बावडेकर, उपमहापौर आनंदा देवमाने, माजी आमदार नितिनराजे शिंदे, स्थायी समिती सभापती संदीप आवटी यांचेसह नगरसेवक व पदाधिकारी यांचेशी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies