Type Here to Get Search Results !

घरात बसून देवधर्म करता येत नाही असे ज्यांना वाटते, त्यांनी शेजारच्या डोंगरावर जाऊन करावा : घंटानाद आंदोलनावरून भाजप सोशल मीडियावर ट्रोल



घरात बसून देवधर्म करता येत नाही असे ज्यांना वाटते, त्यांनी शेजारच्या डोंगरावर जाऊन करावा : घंटानाद आंदोलनावरून भाजप सोशल मीडियावर ट्रोल

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी : राज्यातील मंदिर, मशीद, चर्च, बौद्ध विहार दर्शनासाठी खुली करावी करावी या प्रमुख मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्यावतीने राज्यात “दार उघड उद्धवा दार उघड” हे घंटानाद आंदोलन महाविकास आघाडीचे विरुद्ध करण्यात आले.


 राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यात, गावोगावी सदरचे आंदोलन भाजप कार्यकर्त्यांनी केले. परंतु या आंदोलनाला म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही. या उलट सोशल मीडिया मध्ये भाजपच्या विरोधात “घंटानाद आंदोलनाला” मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.


“ज्यांना घरात बसून देवधर्म करता येत नाही, असे वाटते त्यांनी शेजारच्या डोंगरावर जाऊन करावा. मंदिरे, धार्मिक स्थळे खुली होणारच आहेत पण आत्ता चालू करा हा आग्रह धरून लोकांच्या जीवाशी कशाला खेळता” असे प्रश्नही सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला विचारण्यात येऊ लागले आहेत.  


ज्यांना घरात देव भेटत नाही, माणसांमध्ये भेटत नाही, त्यांनाच देवळात भेटेल का? तर ज्यावेळी वेळ होती, त्यावेळी घंटा वाजवली नाही, आता कशाला वाजवता. असे खडे बोल देखील नेटकऱ्यांनी सुनवले आहेत. एकंदरीत आंदोलन म्हणावे तसे यशस्वी झाले नाही. पक्षाचा आदेश आहे असे समजून केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात अनेक भाजप कार्यकर्त्यांनी धन्यता मानली.  


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies