Type Here to Get Search Results !

Unlock 4: केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर ; काय सुरु काय बंद राहणार पहा सविस्तर



Unlock 4:  केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर ; काय सुरु काय बंद राहणार पहा सविस्तर  


नवी दिल्ली : केंद्र सरकराने 1 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अनलॉक- 4 साठी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार देशातील मेट्रो सेवा करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. येत्या 7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहेत.


नगरविकास मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर मेट्रो सेवा टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील मेट्रो सेवा 22 पासून बंद होती.


कंटेन्मेंट झोन वगळता राज्य आणि केंद्र शासित प्रदेश कुठेही लॉकडाऊन घोषित करून शकत नाही. राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना लॉकडाऊन घोषित करायचा असल्यास आधी त्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करावी, असं केंद्राने दिलेल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.


  • 7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्राची परवानगी
  • 21 सप्टेंबरनंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देता येणार मात्र, यासाठी पालकांची परवानगी आवश्यक
  • 21 सप्टेंबरपासून खुली नाट्यगृह सुरू करण्यास केंद्राची परवानगी
  • धार्मिक कार्यक्रमांनाही परवानगी मात्र, 100 जणांनाच परवानगी असणार
  • अटींसह देशात मेट्रो सेवा सुरु करण्यास मुभा
  • शाळा, कॉलेज सुरू करण्यास परवानगी नाही
  • चित्रपटगृह, स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies