Type Here to Get Search Results !

दार उघड उध्दवा दार उघड ! भाजपचे खरसुंडीत आंदोलन संपन्न


 

दार उघड उध्दवा दार उघड ! भाजपचे खरसुंडीत आंदोलन संपन्न

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : मंदीरे सुरु करावी या मागणीसाठी, कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकार ला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदीर प्रवेशद्वारासमोर भक्तांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले.


एकीकडे राज्य सरकार दारू दुकान, मॉल उघडण्यास परवानगी देत आहे परंतु मंदिरे उघडण्यास परवानगी देत नाही. केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिले आहे परंतु राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. म्हणून मंदिरे उघडण्यासाठी भाजप आटपाडी तालुक्याच्या वतीने खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.


यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य हर्षवर्धन देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष विलासराव काळेबाग, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव गुरव, आटपाडी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, किशोर पुजारी, माजी उपसरपंच अर्जुन पुजारी, राहुल गुरव, वैभव पुजारी, विवेक पुजारी, ओंकार पुजारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies