टाटा समूहाला मागे सारत ड्रीम 11 ला IPL 2020 ला मिळाले टायटल स्पॉन्सर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

टाटा समूहाला मागे सारत ड्रीम 11 ला IPL 2020 ला मिळाले टायटल स्पॉन्सर


टाटा समूहाला मागे सारत ड्रीम 11  ला IPL 2020 ला मिळाले टायटल स्पॉन्सर


मुंबई : चीनी कंपनी व्हिवो या वर्षीच्या आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपवरून मागे हटल्यानंतर मोबाईल फँटेंसी लीगसाठी प्रसिद्ध असलेल्या ड्रीम इलेव्हनने (Dream11) टाटा सारख्या अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकत आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे.


ड्रीम-11 ने हे अधिकार सर्वाधिक 222 कोटी रुपयांची बोली लावत मिळवले. बीसीसीआयने व्हिवोची स्पॉन्सरशिप रद्द करत नवीन स्पॉन्सरशिपसाठी अर्ज मागवले होते. टाटा समूह,  ड्रीम-11, पतंजली आणि बायजु अशा दिग्गज कंपन्यांनी यंदाच्या आयपीएलचे टायटल स्पॉन्सर बनण्यासाठी बोली लावली होती. 


मात्र ड्रीम-11 ने सर्वाधिक बोली लावत यात बाजी मारली. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये यूएईमध्ये यंदा आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise