आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २१ नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २१ नवे रुग्ण

 आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २१ नवे रुग्ण 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २१ नवे रुग्ण आढळून आले असून आज अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८५ झाली आहे.


यामध्ये आटपाडी शहर १३, आवळाई 2, करगणी ३, तडवळे १ व यपावाडी येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी शहरामध्ये आढळून आलेल्या रूग्णामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे सागरमळा येथे आढळून आलेले आहेत. आवळाई येथील आढळून आलेल्या 2 रुग्ण हे बाहेरगावाहून आलेले होते. त्यांना संस्था क्वारंनटाईन करण्यात आले होते. 


करगणी येथील आदळून आलेले तीन रूग्णापैकी एकजण युवा राजकीय नेता आहे. तडवळे येथील पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यपावाडी येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली. तर आजअखेर आटपाडी तालुक्यात २८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस  


.

No comments:

Post a Comment

Advertise