पंढरपूरच्या भाजपाच्या जेष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; नातवाची भावूक पोस्ट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

पंढरपूरच्या भाजपाच्या जेष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; नातवाची भावूक पोस्ट

पंढरपूरच्या भाजपाच्या जेष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; नातवाची भावूक पोस्ट


पंढरपूर : पंढरपूर येथील ज्येष्ठ नेते माजी आमदार एस.टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक यांना कोरोनाची लागण असून त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या प्रार्थनेची त्यांना गरज असल्याचं सांगत त्यांचा नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहली आहे.


काय आहे फेसबुक पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करत असताना परिचारक कुटुंबातील अनेक जणांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. सर्व जण त्यांच्या लक्षणांनुसार योग्य ते उपचार घेत आहेत. सर्व जण डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून व गरज भासल्यास COVID विलगिकरण वॉर्डसमध्ये यशस्वी उपचार घेत आहेत.

आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या मोठ्या मालकांवर पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम कडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यांमुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे. गेली ५० वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इच्छाशक्तीवर आणि आपल्या प्रार्थनेच्या बळावर ते ही लढाई ही जिंकतील अशी आशा करूयात.

वकील साहेब, प्रशांत मालक, उमेश काका, प्रणव दादा व इतर सर्व परिचारक कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे.

धन्यवाद.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise