कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईकोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या उपाययोजनेचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
नागरिकांनी सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, चेहऱ्यावर मास्क/रूमाल वापरणे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाक, डोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या बंद ठेवण्यात याव्यात. दुचाकीवर केवळ चालक, तीन चाकी वाहनात चालक व इतर दोन आणि चार चाकी वाहनात चालक व इतर दोघांना परवानगी असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
अ.क्र.      उल्लंघनाचे स्वरूप                                                  आकारण्यात येणारा दंड
दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास                                                   ५०० रूपये
दुचाकीवर तिघांनी प्रवास केल्यास                                                     ७५० रूपये
४. तीन चाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्ती बसलेल्या आढळल्यास     ५०० रूपये
                    (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)
चारचाकी वाहनातून तिघांपेक्षा जास्त जणांनी प्रवास केल्यास               ५०० रूपये
                   (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)
निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवल्यास (अत्यावश्यक सेवा वगळून)      एक हजार दंड. 
           दोनवेळा दंड झाल्यास तिसऱ्यावेळी दुकानाचा परवाना १५ दिवसासाठी निलंबित.
साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मालक किंवा नोकर दुकाने/ आस्थापनामध्ये आढळल्यास सात                   दिवसांपर्यंत दुकान सील

दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास ५०० रूपये आणि दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १००० रूपये.
होम क्वारंटाईन योग्य रितीने न पाळल्यास एक हजार रूपये.
१० सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २०० रूपये
११. सुरक्षित अंतर न ठेवल्यास १०० रूपये (प्रत्येकी)
१२. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखूचे सेवन केल्यास ५०० रूपये.
१३. दुकानदार/व्यावसायिक/फिरते फळ व भाजी विक्रेते मास्क न वापरल्यास १०० रूपये.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तालुकास्तरावर तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, पोलीस प्रशासन, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), नगरपालिका मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांनी कोविड उपाययोजना नियम २०२० अन्वये दंडात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी आदेशाता नमूद  करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise