श्रीमती उषाताई शिंगटे यांची निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

श्रीमती उषाताई शिंगटे यांची निवड

श्रीमती  उषाताई शिंगटे यांची निवड
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/नारायण माने : श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मंगळवेढाचे नूतन चेअरमन पदाची निवड करण्यासाठी अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक सहकारी निबंधक पी. सी. दुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक २ जूलै २०२० रोजी संचालक मंडळाची सभा संपन्न झाली. सदर सभेत चेअरमन पदासाठी श्रीमती उषाताई शिंगटे उर्फ भाकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नूतन चेअरमन पदी सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सदर निवडीनंतर माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालिका छाया बनसोडे यांच्या हस्ते नूतन चेअरमन उषाताई भाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मावळते चेअरमन गुंडोपंत घाडगे, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संभाजी तानगावडे, जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे संचालक तथा शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर यांनी नूतन चेअरमन उषाताई भाकरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पतसंस्थेच्या पहिल्या महिला चेअरमन म्हणून उषाताई भाकरे यांना चेअरमन पदाची  संधी मिळाली असून त्यांना तालुक्यात मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढ्याचे संचालक सुरेशराव भाकरे यांच्या त्या पत्नी असून जिल्हा परिषदेच्या शेलेवाडी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गतवर्षी पंचायत समितीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे या पंचवार्षिक मध्ये संस्थेच्या संचालक मंडळाच्या सहमतीने सर्वच संचालकांना चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन पदाची संधी मिळालेली आहे.
सदर निवडीस सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिक्षक सचिन जाधव, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर, तालुका अध्यक्ष संभाजी तानगावडे, सरचिटणीस राजेंद्र केदार, मावळते चेअरमन गुंडोपंत घाडगे, व्हाईस चेअरमन दगडू पाटील, सर्व संचालक मंडळ तसेच बाळासाहेब भाकरे आदि मान्यवर उपस्थित होते. सदर सभेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मोहनराव लेंडवे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Advertise