सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेल्या गळफासाच्या कपड्याचा तपास होणार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेल्या गळफासाच्या कपड्याचा तपास होणार


सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेल्या गळफासाच्या कपड्याचा तपास होणार 
मुंबई :  पोलीस आता सुशांतने ज्या कपड्याच्या सहाय्याने गळपास लावून आत्महत्या केली होती. त्या कपड्याचीही तपासणी करणार आहेत. ज्या कपड्याच्या सहाय्याने सुशांतने गळफास लावून घेतला, तो कपडा सुशांतचं वजन उचलण्या योग्य होता का? हे पोलीस तपासून पाहणार आहेत. या हायप्रोफाइल केसमध्ये पोलीस प्रत्येक पैलू तपासून पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, पोलिसांना सुशांतच्या पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा रिपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयित बाबी आढळून आलेल्या नाहीत.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरूनच झाला होता. तसेच व्हिसेरा रिपोर्टनुसार, सुशांतच्या शरीरात किंवा नखांमध्ये कोणत्याही प्रकारचं संशयित रसायन आढळलं नव्हतं. त्यामुळे पोलीस सदर प्रकरणी प्रत्येक कांगोवा तपासून पाहत आहेत. या प्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही चौकशी करण्यात आली.  यामध्ये पोलिसांना माहिती मिळाली आहे की, संजय लीला भन्साळी हे सुशांत सिंह राजपूतला ’बाजीराव मस्तानी’ आणि ’रामलीला’ या चित्रपटांसाठी कास्ट करु इच्छित होते. मात्र एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत झालेल्या कॉन्ट्रॅक्टमुळं सुशांतला हे चित्रपट मिळू शकले नाहीत. त्यामुळं सुशांत आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये तणाव निर्माणा झाला होता. कारण सुशांत हे चित्रपट करु इच्छित होता. मात्र त्या प्रोडक्शन हाऊसनं त्याला कॉन्ट्रॅक्टमधून रिलिज केलं नाही.

No comments:

Post a Comment

Advertise