वरवरा राव यांच्या कुटुंबीयांची मानवाधिकार आयोगात धाव - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

वरवरा राव यांच्या कुटुंबीयांची मानवाधिकार आयोगात धाव


वरवरा राव यांच्या कुटुंबीयांची मानवाधिकार आयोगात धाव
मुंबई : पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले कवी वरवरा राव यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात धाव घेतली आहे. वरवरा राव हे सध्या तुरुंगात असून कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील रुग्णालय आणि तुरुंग प्रशासनाने राव यांच्या प्रकृतीची पारदर्शकपणे माहिती द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.वरवरा राव यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राव यांच्या आरोग्याबाबत तुरुंग प्रशासन कोणतीही माहिती देत नसल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात धाव घेतली आहे.


कोरोनाची लागण झाल्यानंतर तळोजा येथील तुरुंगातून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुन्हा नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. या काळात आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. फक्त त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली एवढीच माहिती आम्हाला दिली असे, राव यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. 


हे मानवाधिकार आयोगाच्या 13 जुलैच्या आदेशाचे उल्लंघन आहे. ज्यात आयोगाने राव यांच्या आरोग्याची माहिती कुटुंबियांना देण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनाला दिले होते.

No comments:

Post a Comment

Advertise