आटपाडी ; पोलीस उपनिरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

आटपाडी ; पोलीस उपनिरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह


आटपाडी ; पोलीस उपनिरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकास कोरोनाची लागण झाली असून आज आलेल्या कोरोना अहवालामध्ये सदर पोलीस उपनिरीक्षक पॉझिटिव्ह आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी पोलीस ठाणे मध्ये कार्यरत असणाऱ्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली होती. या तीन पोलिसांच्या संपर्कातील लोकांचे स्बाव तपासणीसाठी पाठविले असता त्यामध्ये आज आलेल्या अहवालामध्ये सदर पोलीस उपनिरीक्षकास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना योद्धे यांना कोरोनाची लागण होवू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.याबाबत आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे व शासकीय नियमांचे पालन करून मुख्य:ता सोशल डिस्टस्निंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise