कारगील विजय दिन साजरा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

कारगील विजय दिन साजरा

कारगील विजय दिन  साजरा
माणदेश एक्सप्रेस न्युजसांगोला : सांगोला शहरातील शहीद अशोक कामटे बहुदेशीय सामाजिक संघटनेच्या वतीने कारगील  विजय दिनाचा २१ वा वर्धापनदिन कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. स्टेशन रोड येथील तोरणा येथील मुख्यालयात भारतमाता व शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पुजन अध्यक्ष चैतन्य राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना  संघटनेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व सदस्यांनी भारतमातेच्या प्रतिमेस फुले समर्पित करून अभिवादन केले. यावेळी भारत माता कि जय, वंदे मातरम घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Advertise