पिंपरी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी तिघांना पकडले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 8, 2020

पिंपरी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी तिघांना पकडलेपिंपरी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी तिघांना पकडले 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : पिंपरी बुद्रुक ता. आटपाडी, जि.सांगली येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी तिघा युवकांना पोलिसांनी अटक केली. आठ दिवसांपूर्वी पळून गेलेल्या युवक आणि अल्पवयीन मुलीला पकडून आणले. पळून गेलेल्या प्रेमी युगालाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास केला. पळून जाण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकली जप्त केल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोलापूर जिल्हय़ातील वडवळ गावात एका शेतात ऊसात प्रेमी युगुल दडुन बसले होते. मोहोळ येथील सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांनी पळून गेलेल्या मुलाचे व मुलीचे फोटो पोलिसांनीकडे पाहुन माहिती दिली. पिंपरी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीस मोटरसायकल बसून पळवून नेल्याची तक्रार आटपाडी पोलिस ठाण्यात पालकांनी केली आहे. या प्रकरणी अनिकेत मंगेश पवार रा. पिंपरी बुद्रुक, मुसा रज्जाेक मुलानी व अकबर हसन मुलानी दोघेही रा.आटपाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलगी पळवून नेण्यासाठी वापरलेल्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या.

No comments:

Post a Comment

Advertise