आटपाडी तालुक्यातील आज कौठूळी २ तर कानकात्रेवाडी १ पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 9, 2020

आटपाडी तालुक्यातील आज कौठूळी २ तर कानकात्रेवाडी १ पॉझिटिव्ह


आटपाडी तालुक्यातील आज कौठूळी २ तर कानकात्रेवाडी १ पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील कौठूळी येथे २ तर तालुक्यातील हॉटस्पॉट असलेल्या कानकात्रेवाडी येथील १ असे आज एकूण ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यामध्ये कौठूळी येथे २ पॉझिटिव्ह असून यामध्ये ६४ वर्षीय महिला व ७६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. हे दोघेजण रायगड येथून गावी आले होते. त्यांना गावात होम क्वारंनटाइन करण्यात आले होते. दिनांक ८  रोजी त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांचा स्वब तपासणीसाठी मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यामध्ये त्या दोघांचा स्वब पॉझिटिव्ह आला आहे.
तर तालुक्यातील हॉटस्पॉट असलेल्या कानकात्रेवाडी येथे मूळ कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या संपर्कातील तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. त्यामुळे तालुक्यात आज ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आल्याने प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.  

No comments:

Post a Comment

Advertise