Type Here to Get Search Results !

कडेगाव (नगरपंचायत) येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


कडेगाव (नगरपंचायत) येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कडेगाव तालुक्यात कडेगाव (नगरपंचायत) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती कडेगाव उपविभागीय दंडाधिकारी गणेश मरकड यांनी दिली.
कंटेनमेंट झोन मौजे कडेगाव (नगरपंचायत) हद्द येथील - 1) पूर्व - गट क्र. 848 ची जमीन 2) उत्तर - कडेगाव-कडेपूर जुना रस्ता 3) पश्चिम - कनॉल 4) दक्षिण - भारती विद्यापीठ होस्टेल चे कंपाऊंड. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन - 1) पूर्व - गट क्र. 849 ची जमीन 2) उत्तर - गट क्र. 805/32 ची जमीन 3) पश्चिम - गट क्र. 838 ची जमीन 4) दक्षिण - भारती विद्यापीठ होस्टेल चे कंपाऊंड.सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश कडेगाव उपविभागीय दंडाधिकारी गणेश मरकड यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies