मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 10, 2020

मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्यामंगळवेढा तालुक्यातील शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्या
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील सलगर खु.येथील शिक्षक रमेश मधुकर कांबळे (वय 32) याने अज्ञात कारणावरून घरातील लोखंडी हलकडीला सुती दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद पोलिसात आकस्मात मयत अशी झाली आहे.
रमेश मधुकर कांबळे याने दि. ९ रोजी सायंकाळी ५.३० च्या पुर्वी रहाते घरातील लाकडाच्या लोखंडी हलकडीला सुती दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत पोलिसात त्याचा चुलत भाऊ अमोल सिध्दनाथ कांबळे याने फिर्याद दिली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise