Type Here to Get Search Results !

विटा नगरपरिषदेची स्थायी समिती सभा ऑनलाईन वेबद्वारे संपन्न ;ऑनलाईन वेबद्वारे सभा घेणारी पुणे विभागातील पहिली नगरपरिषद


विटा नगरपरिषदेची स्थायी समिती सभा ऑनलाईन वेबद्वारे संपन्न
ऑनलाईन वेबद्वारे सभा घेणारी पुणे विभागातील पहिली नगरपरिषद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन नियमानुसार स्थायी समितीची बैठक ऑनलाईन वेबद्वारे घेण्यात आली. देशासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गचा प्रादुर्भाव लक्षात घेता. विटा नगरपरिषदेने संगणकीय तंत्रज्ञानाचे योग्य नियोजन करत ऑनलाईन वेबद्वारे स्थायी समितीची सभा यशस्वी करुन आदर्श निर्माण केला. ऑनलाईन वेबद्वारे सभा घेणारी विटा नगरपरिषद पुणे विभागातील पहिली नगरपरिषद ठरली आहे.
  दि. ०९ जुलै रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन वेबवर स्थायी समितीच्या सभेला सुरुवात झाली. नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील व मा. नगराध्यक्ष ॲड वैभव पाटील यांनी समिती कक्षामधून ऑनलाईन वेबद्वारे स्थायी समितीच्या दहा सदस्यांशी थेट संपर्क साधत ऑनलाईन हजेरी घेतली.  तदनंतर सभेच्या विषयपत्रिकेनुसार एक एक विषयावर चर्चात्मक संवाद घडवत विषयांची मंजूरी घेतली. स्थायी समितीच्या या सभेत एकूण २८ विषय होते यामध्ये निविदा मंजुरी, विविध बील देयक इत्यादी चा समावेश होता. ऑनलाईन वेबद्वारे हे सर्व विषय सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
विटा पालिकेने ऑनलाईन सभा घेऊन राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासन निर्णयानुसार पालिकेने आदर्शवत संगणकीय नियोजन करुन ऑनलाईन वेबद्वारे ही सभा यशस्वी करत आदर्श निर्माण केला आहे.  विटा नगरपरिषद हे राज्यासह देशात वेगवेगळ्या माध्यमातून "रोलमॉडेल" ठरत आहे. स्वच्छतेत देशपातळीवर स्थान मिळवलेल्या विटा पालिकेने सध्याची परिस्थितीवर अद्यावत उपायोजना करत ऑनलाईन वेबद्वारे स्थायी समितीची सभा यशस्वी केली हे कौतुकास्पद आहे. सर्व सदस्यांनी आहे त्या ठिकाणावरून या सभेस संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हजेरी लावत सहभाग घेतला. या सभेसाठी संगणकीय नियोजन पालिकेचे नोडल अधिकारी शांताराम कांबळे यांनी यशस्वीपणे पार पाडले यामुळे ही सभा नियोजनबध्दरित्या संपन्न झाली.
विटा नगरपरिषदेने आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेत सर्व सदस्यांनी सहभागी होत सकारात्मक प्रतिसाद दिला. सभेमध्ये सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहेत. शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत ही सभा यशस्वी पार पडली. असे प्रतिपादन यावेळी नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील यांनी केले. सदर बैठकीस नगराध्यक्षा सौ.  प्रतिभाताई पाटील, मा. नगराध्यक्ष वैभव पाटील, प्रशासकीय अधिकारी  बाजीराव जाधव उपस्थित होते. स्थायी समितीची ऑनलाईन वेबद्वारे  सभा मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.  विटा नगरपरिषदेचे नोडल अधिकारी शांताराम कांबळे यांनी सभेचे सर्व संगणकीय नियोजन यशस्वीपणे पार पाडले. नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, स्थायी समिती सदस्य यांनी या नव्या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies